Translate

Monday 4 May 2020

Careers in Administrative Services / Civil Services – UPSC / MPSC / IAS / IPS etc.

Administrative Services / Civil Services – UPSC / MPSC / IAS / IPS etc.
Civil Services, अर्थात नागरी सेवा, हे क्षेत्र अनेक तरुणांचे ध्येय व स्वप्न असते. देशातील विविध शासकीय विभागांच्या सर्वोच्च स्थानी कार्य करणारे कार्यक्षम अधिकारी या क्षेत्रातून, अर्थातच या क्षेत्राच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे आलेले असतात. व्यापक अर्थाने बघितल्यास देश चालविण्याची जबाबदारी ही नागरी-प्रशासकीय सेवेतील अधिकारी निभावत असतात. UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा कठीण असतात, बुध्दीचा कस लावणाऱ्या असतात, हे खरे जरी असले तरी नियोजनपूर्वक अभ्यास, शिस्तपूर्वक परीश्रम, परिश्रमातील सातत्य आणि स्वप्नांच्या मागे धावण्याची प्रबळ आंतरिक प्रेरणा असेल तर या क्षेत्रात यशस्वी होऊन उच्च पदाला गवसणी घालणे सुखकर होऊ शकते. या क्षेत्राशी संबंधित उपविभाग थोडक्यात पुढीलप्रमाणे. संबंधित उपक्षेत्रांची सविस्तर माहिती आपण अभ्यासातून व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनातून प्राप्त करु शकतात.

Civil Services / Railway / Politics Custom Services
U.P.S.C, S.S.C IAS, IPS, IFS, IFS - Officer,
Ranger, Guard, Fire Watcher (Indian Forest Service)
Railway Services: Civil & Allied Services
(i) Indian Administrative Service.
(ii) Indian Foreign Service.
(iii) Indian Police Service.
(iv) Indian P & T Accounts & Finance Service, Group 'A'.
(v) Indian Audit and Accounts Service, Group 'A'.
(vi) Indian Revenue Service (Customs and Central Excise) Group 'A'
(vii) Indian Defence Accounts Service, Group 'A'.
(viii) Indian Revenue Service (I.T.), Group 'A'.
(ix) Indian Ordnance Factories Service, Group 'A' (Assistant Works Manager, Administration)
(x) Indian Postal Service, Group 'A'.
(xi) Indian Civil Accounts Service, Group 'A'.
(xii) Indian Railway Traffic Service, Group 'A'.
(xiii) Indian Railway Accounts Service, Group 'A'.
(xiv) Indian Railway Personnel Service, Group 'A'.
(xv) Post of Assistant Security Commissioner in Railway Protection Force, Group 'A'
(xvi) Indian Defence Estates Service, Group 'A'.
(xvii) Indian Information Service (Junior Grade), Group 'A'.
(xviii) Indian Trade Service, Group "A" (Gr.III)
(xix) Indian Corporate Law Service, Group "A"
(xx) Armed Forces Headquarters Civil Service, Group ‘B’ (Section Officer’s Grade)
(xxi) Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service, Group 'B'.
(xxii) Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service, Group 'B'.
• (xxiii) Pondicherry Civil Service, Group 'B' (xxiv) Pondicherry Police Service, Group 'B’ 

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
            - Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment