Translate

Monday 4 May 2020

Careers in Banking and Finance, Insurance and Investment


Banking and Finance, Insurance and Investment

पैसा कमावण्यामागे केवळ दैनंदिन जीवनातील आर्थिक गरजा पूर्ण करणे इतकेच उद्दिष्ट नसते व तसे नसावे. तर भविष्यकालीन गरजांची तरतूद, उतारवयातील आर्थिक गरजा भागविता येतील अशी व्यवस्था करुन ठेवणे हे आजच्याच कमाईतून साध्य करायचे असते. याकरिता आर्थिक उत्पन्नातील एक विशिष्ट हिस्सा योग्य ठिकाणी गुंतविणे आवश्यक असते. अशी गुंतवणुक करण्यास मार्गदर्शन करणाऱ्या व प्रत्यक्ष गुंतवणुक स्विकारणाऱ्या अनेक संस्था असतात. आर्थिक-औद्यागिक प्रगतीमुळे मोठ्या व्यावसायिंकाशिवाय लहान व्यावसायिक व नोकरदारांचा देखील भविष्यकालीन गरजांसाठी गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला असल्याने या क्षेत्रातही असंख्य संधी उपलब्ध आहेत.

Banking and Finance :

  • Reserve Bank Officers
  • Nationalize Banking Officers
  • Private Banking Officers
  • Co-operative Banking Officers
  • Banking clerical staff
  • Loan officers
  • Specialist officers in Banking
  • MBA in Banking Technology
  • MBA in Banking & Finance
  • MBA in Banking & Insurance
  • Post Graduate Diploma in Financial Technology
  • Post Graduate Diploma in Financial Management
  • BBA in Banking and Finance
  • BBA in Banking and Insurance
  • B.Com in Banking Management
  • Gold Valuer


Insurance and Investment
·       Acturials
·       B.Com (with Insurance)
·       Dip in Acturial Sciences
·       Equity Analyst 
·       Financial Planners
·       Health Insurance
·       Insurance Agents
·       Stock brokers & investment analysts
·       Estate, Property brokers
·       Back-office jobs in insurance companies
·       Back-office jobs in investment companies
·       Post Graduate Diploma in Investment Planning and Life Insurance

 विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.

- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment