Translate

Monday 4 May 2020

Careers in Computer Science and Information Technology – Software / Hardware / Networking

Computer Science and Information Technology – Software / Hardware / Networking.
Computer, Internet, Mobile, Apps या गोष्टी आज आपल्या जगण्याच्या अविभाज्य भाग झाल्या आहेत. कोणत्याही समस्येचे उत्तर आपणास या चार गोष्टींच्या आधारे मिळू शकते. म्हणूनच आजच्या काळाला माहिती-तंत्रज्ञानाचे युग असेही म्हटले जाते. केवळ उद्योग-व्यवसायच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक घटकाला संगणक व माहिती तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे. या क्षेत्राची व्याप्ती व विस्तार खूपच मोठा आहे. म्हणूनच या क्षेत्रातील तज्ञ व अभ्यासू व्यक्तींना आजही मोठी मागणी आहे व पुढच्या काळात देखील असणार आहे. संबंधित उपक्षेत्रांची सविस्तर माहिती आपण अभ्यासातून व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनातून प्राप्त करु शकतात. 
  • C-DAC
  • Cloud computing
  • Artificial Intelligence
  • E commerce
  • Web designer /Web programming / programmer
  • Computer Hardware
  • Computer Networking
  • Computer software / Programmer
  • Computer-Aided Design and Drafting (CADD)
  • Ethical hacking
  • Mobile apps development
  • Computer aided graphics & commercial designing
  • System analysts 
  • Cyber Security
  • Social Media Management
  • Digital Marketing
  • VLSI/ Chip Designing 
  • B.Sc. - Computer Science with Artificial Intelligence
  • B.Sc. - Computer Science with Machine Learning
  • P.G. Diploma in Advanced Cloud Computing
  • B.Sc. - Computer Science with Cyber Security


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
            - Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment