Translate

Monday 4 May 2020

Careers in Humanities & Linguistic : Mental, Moral & Social Sciences

Humanities & Linguistic : Mental, Moral & Social Sciences – Geography / Economics / Psychology / History etc.
Linguistic – copy writing / translator / Interpreters / Writer / Poet / Language teacher
Social welfare / Social work / Human well-being / Human rights / Mental Health

Humanities, या क्षेत्राला कला शाखा असेही म्हटले जाते. पारंपरिक ज्ञानशाखांपैकी ही एक शाखा आहे. इंग्रजांनी क्लर्क घडविण्यासाठी सुरु केलेली शाखा असे याबद्दल गैरसमजातून म्हटले जाते. या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व विविध क्षेत्रात उच्चस्थानी पोहोचलेल्या अनेक व्यक्तींनी हा समज कसा चुकिचा आहे हे दाखवून दिले आहे. खरेतर इतर अनेक ज्ञानशाखांना सहाय्यकारी अशी ही शाखा आहे. या शाखेतील विविध विषयांच्या ज्ञानाचा व संशोधनांचा उपयोग जवळपास इतर सर्वच शाखांमध्ये केला जातो. उदा. एखाद्या विशिष्ट विषयावर वेबसाईट तयार करण्याचे काम वेब-प्रोग्रामर ही संगणक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती करते, मात्र वेबसाईटवरील content नेमका कसा मांडायला, लिहायचा याकरिता भाषाकौशल्यात पारंगत असलेल्या व्यक्तीची मदत घेणे फायद्याचे ठरते. याचप्रमाणे व्यवस्थापन, प्रशासन, नागरी सेवा, मिडिया, राजकारण, समाजकारण, समाजसेवा, मनोरंजन अशा जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये कला शाखेतील विविध विषयांच्या ज्ञान-संशोधनाचा उपयोग करुन घेतला जात असतो. महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय व भौतिक सुखसुविधांच्या पलिकडे जाऊन समाजस्वास्थ्य व समाजव्यवस्था टिकवून ठेवणे, सामाजिक-सांस्कृतिक वारसा टिकवून पुढे नेणे, याबाबतीत कला शाखेतील सर्वच विषय व उपशाखा योगदान देत असतात. अजुनही या क्षेत्रात संशोधनाच्या व करिअरच्या असंख्य संधी आहेत. फक्त योग्य निवड करुन ठामपणे आपल्या कार्यात कार्यरत राहिले पाहिजे.

Linguistic
  • Advertisement copy writing
  • Columnist
  • Content writing / Copy Writing
  • Editors
  • Feature writing
  • Foreign Languages - French / German Studies 
  • Interpreters
  • Languages specialists 
  • Call agents
  • Modi-lipi reading (मोडी लिपी)
  • Novel / Story writing / Poetry
  • Proof reading
  • Sanskrit
  • Translating / Translators / Book translators
  • Website content writer

Mental, Moral & Social Sciences
  • Anthropology
  • Archaeology & Heritage Management
  • B.A. Business Economics
  • B.A. Econometrics
  • B.A. Rural Economics
  • Cartography – data for maps / maps preparation
  • Economists
  • Geography
  • Historians / History / Curators
  • Home science / Home economics
  • Indian Econ / Statistics Service
  • Political Science
  • Psychology / Psychologist
  • School Counseling
  • Rehabilitation Psychology
  • Sociology / Social work
  • Art Conservation / Restoration.
  • Monuments & Sculpture Restoration.
  • Museology
  • M.A. in Public Policy
  • B.Sc. - Mental Health
  • B.Sc. - Event Studies
  • B.A. - M.A. in Mass Media and Communication
  • B.Sc. Psychology
  • B.Sc. - M.Sc. Clinical Psychology
  • B.Sc. - Hospitality and Tourism
  • B.A. - Liberal Arts
  • Diploma in Industrial Psychology

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
(Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
Director : Mindsearch Counseling
Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment