Translate

Monday 4 May 2020

Careers in Consulting – Counseling / Family relations / Astrology / Vastu shastra etc.


Consulting – Counseling / Family relations / Astrology / Vastu shastra etc.

मनुष्याला त्याच्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक जीवनात असंख्य समस्या भेडसावत असतात. या समस्या सोडविण्यासाठी तो कायम समस्येशी संबंधित तज्ञ मार्गदर्शकाच्या शोधात असतो. औद्यागिक, सामाजिक व आर्थिक प्रगती जितक्या वेगाने झाली, तितक्याच वेगाने मनुष्याच्या आयुष्यातील समस्या देखील वाढल्या आहेत. त्यामुळेच मार्गदर्शन, समुपदेशन (Counseling), व इतर तज्ञांच्या मार्गदर्शनाची मागणी देखील वाढली आहे. सेवा व्यवसाय प्रकारच्या या क्षेत्रात अभ्यासू व्यक्तींसाठी व विशेषत: संवाद व इतर सामाजिक कौशल्ये धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी असंख्य संधी उपलब्ध आहेत.

        Astrology
        Career Counsellors
        Child Care
        Child Guidance
        Corporate Coach
        Image Consultant
        Counseling - clinical / educational / industrial / social 
        Drug/ Alcohol abuse Counsellors
        Ethologists
        Family Relations
        Gem Identification
        Gemology
        Rehabilitation Counselors
        Health Education / Public Health
        Market Researcher
        Marital, Pre-marital and Family Counsellors
        Marriage Bureau
        Mental health counselors
        Occupational therapists
        Placement services
        School Psychologist
        Vastu Shastra
        Graphology


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment