Translate

Monday 4 May 2020

Careers in Fashion and grooming / Beauty culture


Fashion and grooming / Beauty culture

वस्त्र, ही मनुष्याची प्राथमिक गरज जरी असली तरी काळाच्या ओघात बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीत वस्त्र हे केवळ प्राथमिक गरज न रहाता दर्जा प्रतिक बनले. कपड्यांच्या बाबतीत आवडी-निवडी, चोखंदळपणा वाढत गेला. स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी व स्वत:च्या कल्पक सादरीकरणासाठी वेशभूषेचा उपयोग होऊ लागला. याव्यतिरिक्त वस्त्र परिधान करण्याबाबतीत पारंपरिकदृष्ट्या सांस्कृतिक भिन्नता व सांस्कृतिक मूल्य देखील आहेच. अर्थात या व्यवसायाची व्याप्ती केवळ इतकीच मर्यादित नसून, टी.व्ही., सिनेमा, प्रसारमाध्यमे अशा सर्वच ठिकाणी कार्यरत व्यक्तींचे बाह्यरुप खुलविण्याकरिता वेशभुषाकारांची व त्यासोबतच सौदर्यप्रसाधन तज्ञांची मागणी मोठी आहे. अर्थातच कल्पक, अभ्यासू व सौंदर्यवादी दृष्टीकोन या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो. या क्षेत्रातील व या क्षेत्राशी संबंधित काही संधींची माहिती पुढीलप्रमाणे.

        Beauty culture / Beautician / Hair designing
        Fashion Business Management
        Fashion Designing
        Fashion journalism: Freelance
        Fashion photography
        Fashion styling and image designing
        Personal grooming
        Wedding make-up
        Perfumery and Cosmetic Management
        Fashion Choreography


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment