Translate

Monday 4 May 2020

Careers in Teaching and Education – Primary / Secondary / College / University teaching etc. and related careers


Teaching and Education – Primary / Secondary / College / University teaching etc. and related careers.

ज्ञानदान हे पवित्र कार्य ज्या पेशात केलं जातं तो म्हणजे शिक्षकी पेशा! कोणत्याही देशाच्या विकासाचा, समाजव्यवस्थेचा व कुटुंब आणि वैयक्तिक व्यक्तीविकासाचा मुख्य आधार हा शिक्षण व्यवस्थाच आहे. प्रत्येक काळातील नव्या पिढीला उज्वल भविष्याचे स्वप्न व विकासाची दिशा आणि जगण्याचा संस्कार शिक्षक बांधव देत असतात. या दृष्टिने शिक्षकांची सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी खूप मोठी असते. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठ स्तरावरील शिक्षण अशी शिक्षणव्यवस्था खूप व्यापक आहे. तसेच इतरही अनेक उद्योग शिक्षणव्यवस्थेशी निगडीत आहे. म्हणूनच या क्षेत्रातही अभ्यासू व सामाजिक बांधिलकी बाळगणाऱ्या व्यक्तींसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

        Pre-primary Teachers.
        Primary Teachers.
        Secondary & Higher Secondary Teachers.
        College & University Teachers / Professors.
        M.Phil. / NET / SET / Ph.D.
        Library Science / Library and information science
        D.T.Ed. / B.Ed. / M.Ed. / M.P.Ed.
        Physical education
        Educational content writing
        Educational Officers
        Educational softwares development.
        Language Training.
        Special Education Rehabilitation
        Special Educators for Mental / Hearing / Visual / Physical Disabled / Impaired
        Private Coaching classes for different subjects.
        Publication – Books / Blogs / Magazines


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment