Translate

Tuesday 5 May 2020

Free Seminar for Parents

 नमस्कार,
मी डॉ. योगेश वानखेडे,
मानसशास्रीय समुपदेशक म्हणून आपणाशी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधत आहे.
नव्या शतकाचे प्रतिनिधित्व करणारी तरुण पिढी बुद्धिमत्तेच्या व तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगल्भ जरी असली तरी या पिढीच्या भावनिक व वागणुकीबद्दलच्या अनेक समस्या देखील आहेत. विशेषतः तीव्र शैक्षणिक व व्यावसायिक स्पर्धेच्या काळात तर या समस्या विद्यार्थ्यांना अधिकच त्रासदायक ठरून त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त करत आहेत. म्हणूनच या वयाच्या मुलांनी जीवन संपविण्यापर्यंतचे आततायी निर्णय घेतल्याच्या बातम्या आपणास नेहमीच वाचायला-ऐकायला मिळतात. हे बघितल्यावर असे वाटते की, आपणास केवळ 90% पेक्षा अधिक मार्क्स मिळविणारी पीढी घडवायची आहे, की जीवनाला 100% सामोरी जाणारी, जीवनातील सगळ्याच प्रसंगांना धैर्याने व सक्षमतेने सामना करणारी पिढी घडवायची आहे. ज्या ह्या पिढीकडून आपण आपल्या समृध्द कुटुंबाचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे स्वप्न बघतो आहोत, त्या ह्या पिढीतील अनेक मुलांना दुर्देवाने आक्रमकता व नैराश्याने ग्रासलेले दिसते. म्हणूनच मुलांना योग्यवेळी समजून घेणे, सावरणे हे त्यांच्या शैक्षणिक यशासाठी व कौटुंबिक स्वास्थ्यासाठी आवश्यक झाले आहे. आपल्या मुला-मुलींचे भावविश्व कसे जपावे, चुकीचे पाऊल पडण्यापूर्वीच त्यांना कसे सावरावे, मुलांच्या उच्च शैक्षणिक प्रगतीत एक पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असावी, आपल्या मुलांच्या सुखी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक जीवनासाठी अत्यावश्यक असलेली भावनिक प्रगल्भता कशी वाढवावी? यासारख्या प्रश्नांवर एक सेमिनार आम्ही नियमित घेत असतो. ह्या सेमिनारला कोणतेही शुल्क किंवा फी नाही. आपल्या कुटुंबात इ. 5 वी किंवा त्यापुढील कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी असल्यास आपणास आग्रहाचे निमंत्रण. कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन समजून घेण्याकरिता कृपया पुढील क्रमांकावर whatsapp किंवा मेसेज द्वारे नावनोंदणी करावी.
(पालकांचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, वर्ग ही माहिती पाठवावी.)

धन्यवाद व सस्नेह शुभेच्छा !
-        डॉ. योगेश वानखेडे, मो. 9881168509
कृपया आपल्या माहितीतील इतर विद्यार्थी व पालकांना हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती.

No comments:

Post a Comment