Translate

Monday 4 May 2020

Careers in Photography / Videography – Cinematography / commercial / wild / nature etc.

Photography / Videography  – Cinematography / commercial / wild / nature etc.

असं म्हणतात की, एक फोटो किंवा एक चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त बोलते. मोबाईल फोन सारख्या साधनामुळे जरी प्रत्येकाच्या हातात आज कॅमेरा आलेला असला तरी केवळ क्लिक करुन समोरच्या वस्तुची, व्यक्तीची प्रतिमा मोबाईल कॅमेऱ्यात बंद करणे म्हणजे काही फोटोग्राफी नव्हे. फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी ही कला आहे. या कलेला केवळ कॅमेरा या साधनापेक्षा कल्पक व सौदर्यात्मक दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो. हा दृष्टीकोन ज्याच्याकडे असतो तोच एखाद्या प्रतिमेत जीवंतपणा आणू शकतो. या कलेचे चांगल्या प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन टी.व्ही. व सिनेमाक्षेत्र, जाहिरातक्षेत्र, फॅशन उद्योग अशा असंख्य व्यावसायिक संधी आहेत. यातील काही संधींची माहिती पुढीलप्रमाणे.

        Commercial Photography
        Environmental Photography
        Fashion Photography
        Medical Photography
        Journalism Photography
        Industrial Photography
        Wild life Photography
        Event / Wedding Photography
        Aerial Photography
        Cinematography

विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment