Translate

Monday 4 May 2020

Careers in Media / Journalism – Print media / Electronic Media / Web journalism etc.


Media / Journalism – Print media / Electronic Media / Web journalism etc.

मिडिया अर्थात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी सक्षम व निर्भिड पत्रकारिता प्रत्येकच काळात महत्वाची मानली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील माध्यमांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. आजच्या न्युज-चॅनेल्सच्या वाढत्या लोकप्रियतेच्या काळात मिडिया या क्षेत्रात करिअर करण्यासाठी असंख्य तरुण-तरुणी आकर्षित होत आहेत. आसपासच्या जगताचे सूक्ष्म निरीक्षण, समाजातील विविध घटनांचे अभ्यासपूर्ण आकलन, परखड मत प्रदर्शनासाठी लेखन व भाषण ही गुणवैशिष्ट्ये ज्या तरुणांकडे आहेत, त्या तरुणांना तर या क्षेत्रात प्रगतीची झेप घेण्यासाठी अनेक संधी आहेत.

        Announcer
        Editors
        Fashion journalism
        Journalism - Electronic - TV / Radio
        Journalism - Print – Newspaper / Magazine
        Medical journalism
        Reporters
        Script writing
        Sports journalism
        Web Journalism


विशिष्ट करिअर बद्दल आपणास आकर्षण जरी असले किंवा त्या करिअरला सामाजिक, आर्थिक दृष्ट्या प्रतिष्ठा जरी असली, तरी केवळ या आधारे संबंधित करिअरची आपल्यासाठी निवड करणे योग्य ठरत नाही. कारण प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशिष्ट क्षमतांची, व्यक्तिमत्व गुणांची आवश्यकता असते. त्या करिअरची खरोखर आवड व कल आहे, की केवळ आकर्षण, हे देखील तपासून बघणे गरजेचे असते. म्हणूनच कोणतेही करिअर व शिक्षणक्रम निवडतांना त्या करिअरला आवश्यक असलेल्या क्षमता, पात्रता, व्यक्तिमत्व गुण व अभिरुची विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हे समजून घेण्याकरिता, त्याबाबतचे शास्रशुध्द परीक्षण करण्याकरिता आपणास मानसशास्राच्या तज्ञ संशोधकांचे व समुपदेशकांचे सहाय्य घेता येऊ शकते. याकरिता मानसशास्त्रीय समुपदेशक I.Q. Test, Aptitude Test, E.Q. Test, Personality Test, Interest Test यासारख्या संख्याशास्रीय दृष्ट्या प्रमाणित चाचण्यांचा उपयोग करतात व त्याद्वारे कोण-कोणत्या क्षेत्रात मुलांना यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, व कोणत्या क्षेत्रात ते अपयशी होण्याची शक्यता आहे, याबाबतचे counseling आपणास प्रदान करतात. ही प्रक्रिया शास्रशुध्द असल्याने याद्वारे मिळणारे निष्कर्ष आपणास नक्कीच दिशादर्शक व पुढील शैक्षणिक प्रवास सुखकारक होण्यास सहाय्यक ठरतात.
- Dr. Yogesh D. Wankhede,  (M.Phil., Ph.D.)
            (Consulting Psychologist, Psychological Counselor & Behavioral Trainer)
            Director : Mindsearch Counseling
            Mob. 9881168509 / 8830638488

No comments:

Post a Comment